(आज तसे पहिले तर मी प्रथमच ब्लोग वर पोस्ट टाकत आहे. तर मित्राणो काही चुका असल्यास मला त्वरीत सांगा जेणे करुण मला पुढील ब्लोग लिहीताना मदत होईल.)
कामणदुर्ग नवीन ट्रेकर्स मंडळीना तसे नाव नवीन आहे. पण येत्या काही वर्षात बहुतेक भटके ट्रेकर्स मंडळी या वनदुर्गावर येतात. तेव्हा काही मंडळीना "कामणदुर्ग क्या चीज है वो समज मे आती है" माझ्या बाबतीत हि तसंच झालं. मला वाटलं असेल छोटासा किल्ला वसई जवळ २/३ तासात होईल म्हटलं शिवाय ट्रेकींगमध्ये प्रथमच श्री गणेशा करणार होतो. त्यामुळे फालतू आत्मविश्वास होता. शेवटी ट्रेकची तारीख ठरवण्यात आली ५ जून २०११ पण माझ्या जवळील मित्रामधील कोणी येण्यास मागेना शेवटी माझा जवळचा मित्र पांड्या उर्फ (सुमित कदम) येण्यास तयार झाला. शनिवारी रात्री मी त्याला २/३ लिटर पाणी घेण्यास सांगितले तसेही तो वसईला राहत असल्याने त्याला जवळच होते. शनिवारीच कामणदुर्गा बद्दल माहिती जमा केली. तसं पाहता कामणदुर्ग हा उल्हास नदीवर टेहाळणीसाठी बांधण्यात आला आणि तो ठाणे जिल्यातील उंचीत दुसरया क्रमांका वर असलेला दुर्ग आहे. येथे पाहण्यायोगे कातळात खोदलेल्या पायऱ्या तसेच ५ पाणीच्या टाकी आहेत. तसेच पायऱ्या चढून गेल्यावर उध्वस्त प्रवेशद्वार आहे.
मला घरातून निघताना थोडा वेळच झाला. अंधेरी स्टेशनला सकाळी ७.३० वाजले. पांड्या सारखा फोनवर फोन करत होता शेवटी ७.४५ ची विरार फास्ट पकडली आणि बोरीवली स्टेशन नंतर पांड्याचा फोन केला . तू वसईला न थांबता नायगावला ये तेथुन जायायचे आहे. पांड्या नायगावला पोचला होता मला नायगाव ला पोहचेपर्यंत घडयाळात ८.२० झाले होते. नायगाव स्टेशनला थोडा नाश्ता करून चिंचोटीसाठी रिक्षा पकडली. चिंचोटी हे भिवंडी-वसई महामार्गावरील गाव येथून कामन गावासाठी रिक्षा मिळतात. आम्ही लगेच कामन गावासाठी रिक्षा पकडून किमान ९.१५ ला कामन गावात हजर झालो. कामन गावातून पुढे बेलकुंडी या गावात आम्ही दोघे पोहचलो तेव्हा समोरील कामणदुर्ग पाहून आमची चांगलीच फाटली.
बेलकुंडी गावातून दिसणारा कामणदुर्ग
थोडा झूम करून
गावातील एका महिलेला गडावर जाण्याचा रस्ता विचारला. तिने थोडे उजवे डावे वळा असे काही सांगितले ते माझ्या काय पांड्या तर पार डोक्यावरून गेले. मग थोडे पुढे गेल्यावर एक सुका ओढा लागला. ओढ्यातच एक विहीर होती. गावातील महिलेच्या खाणाखुणा पटत चालल्या होत्या.
हीच ती विहीर
रस्त्यावरील करवंदे खात जाताना पांड्या
दोन सुखे ओढे ओलांडुन आम्ही आता आम्ही घनदाट जंगलात प्रवेश केला. पायाखालची पायवाट जास्त मळलेली नव्हती. पायवाट आता खडी चढण होत चालली होती तसा कामणदुर्ग दिसेनासा झाला.
आता जसेजसे वरती चढत होतो तसतसे छातीच्या भाता जोरजोरात वाजू लागत होत्या. सूर्यदेव आपले काम चोख बजावत होता. अंगातून घामाच्या गंगा जमुना वाहू लागल्या होत्या शेवटी आम्हाला केळीची झाडे लागू लागली. पाहतोतर काय पुढे वाटच नाही.
वाट शोधल्यास सापडेना वेळ निघत चालला होता. आता दुपारचे १२.३० वाजले होते पोटात कावळे ओरडायला सुरवात झाली होती. शेवटी डोंगराची सरळ चढण चढून वर आलो आणि समोरील झाडीतून काही गावकरी येताना दिसले. त्यांनी मूळ वाट दाखवून दिली आम्ही बांबूच्या वनात प्रवेश केला थोड्याच वेळात आम्ही डोंगराच्या सपाटी वर आलो वाटलं आलं कामणदुर्ग आणि समोरील दुष्य पाहून कोणीतरी कानाखाली मारल्यासारखी झाली. पाहतोतर काय अजून एक डोंगर चढायचा होता
आणि आमच्या जवळील पाणी संपत आले होते आता क्षणभर वाटले परत खाली जावे पण पांड्या काही ऐकत नव्हता काही केल्या वर जायचंच पुढे पाहू काही होईल ते होईल असे त्याचे शब्द ऐकून मीही पुढे जाण्यासाठी निघालो. आता कामणदुर्ग जवळ येत चालला होता. दुपारचे १.३० वाजला होता. दुर्गाच्या खालील टप्यात आम्ही दोघे पोचलो होतो गावातील काही मंडळी बांबूची झाडे तोडत होती त्यांना वाट विचारून पुढे निघालो
कामणदुर्ग शेवटचा टप्पा
थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या
पायऱ्या चढून वर गेल्यावर उजव्या हाताला पाण्याचे सुके टाके लागले
या टाक्याच्या वरच्या बाजूने थोडे पुढे परत आम्हाला कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या
आम्ही गडाच्या सर्वात उंच माथ्यावर आलो आणि काय सांगू जी कष्ट गड चढताना झाली ती क्षणात गायब झाली काय ते दुष्य अहाहा पुढे वाटेत काही सुकी टाकी नजरेस पडली
गडफेरी आटोपती घेऊन आम्ही पेटपुजा करू लागलो तेव्हा कळले कि पाण्याची अर्धी बॉटल राहिली होती. घड्याळ पाहीले तर दुपारचे २.४५ वाजले होते थोडा आराम करून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
आता आमची पाऊले पटापट पडू लागली कारण वाट माहिती म्हणून नाही तर वेळेअभावी शिवाय गडावर पावसाळी वार्तावरण तयार झाले होते.
गडावरून दिसणारे कामन गाव
आम्हाला आता पाण्याची जास्त गरज नव्हती आणि आराम केल्यामुळे चालण्यात वेग आला होता गडावर जाताना लागलेले दोन सुके ओढे पार करून बेलकुडी गावात आलो आणि मागे पाहिले तेव्हा दुर्गावर जोरदार पाऊस पडत होता.
आम्ही बेलकुडी गावातून लगेच कामण गावात आलो. घडयाळात तेव्हा ५.३० वाजले होते कामण गावात मस्त मिसळपाव आणि वडापाव दाबून रिक्षा पकडून चिंचोटी उतरणार तोच पाउसाची एक सर लागून गेली. चिंचोटीवरून दुसरी रिक्षा पकडून नायगाव स्टेशन गाठले. पांड्याला निरोप दिला आणि ट्रेनमध्ये बसलो. भायंदरच्या खाडीवरून सहज नजर कामणदुर्गावर टाकली तेव्हा मनात निश्चय केला की आता कोणताही लहान किवा मोठा किल्ला/गड असल्यास योग्य तयारीनिशीच जाणार नकळत त्या दुर्गाकडून काहीतरी शिकून गेल्यासारखं वाटलं.