सह्याद्री कितीही फिरला,वर्णिला;
तरीही दरवेळी तो आपल्याला नवीन अनुभूती देणार हे निश्चित. ट्रेकिंगचं भूत मानगुटीवर
बसल्यापासून कोणते ट्रेक कधी करायचे आणि कसे करायचे यांची एक मोठी लिस्ट बनली आहे आणि
त्याच लिस्ट मधून 2 नाव यावेळी काढली. पहिला नाव होतं "फडताड" हे नाव जरी
ऐकला तरी भले भले ट्रेककर गप्प बसतात कारण नावाची धास्तीच तेवडी... दुसरं नाव होतं
"भिकनाळ" तसा पाहायला गेलो तर रायगडच्या आजूबाजूला तश्या एका पेक्षा एक
सरस घाटवाटा आहेत पण त्यात ह्या उजव्या ठरतात...फडताड आणि भिकनाळ
सह्याद्री मधील दोन
रौद्र नाळा दोघांच्या
वाटा शोधून त्यांचा
माथा किंवा पायथ्याजवळून
सुरवात करताना २ तासांची
तंगडतोड करावीच लागते.
रायगडाच्या
ह्या दोन वाटा
आजही अनवट आणि
अवघड अपरिचित आहेत
त्यामुळे ह्या दोन्ही
वाटा करायची इच्छा
मनात खूप वर्षापासून
होती.
तसं पाहायला
गेलं तर रायगड
ते तोरणा या
परिसरात कावळ्या बावल्या खिंड,
बोचेघोळ,
गायनाळ,
निसनी,
बोराट्याची
नाळ,
सिंगापूर नाळ,
तवीची नाळ,
आग्यानाळ,
फणशीची नाळ,
फडताड,
भीकनाळ अश्या घाटवाटा घाटावरून कोकणात आहेत.
ह्यांतील ठराविक वाटा
सोडून बाकी सर्व
वाटा पूर्वी व्यापारी
मार्गासाठी वापरल्या जात असाव्यात.
१७ फेब्रुवारीला बिबनाळ आणि फणशीची
नाळ झाली होती
त्यामुळे तेथील परिसर आता
चांगलाच परिचित झाला होता
ह्यावेळी रुपेश आणि विनोद
आम्ही येतो असे
बोलून मागेच लागले
होते अमोलला कॉल
करून ते दोघे
येत असल्याची माहिती
दिली. शेवटी नाही
नाही हो हो
करता १६ तारखेला
मुंबईवरून २ बाईक
वरून आम्ही चौघे
निघालो अमोलचा अजून एक
मित्र सुमित मुंबईवरून एसटी
ने नसरापूरला येणार
होता त्याला अमोलने
पीकअप करून आम्ही
६ जण आमचे
रणगाडे घेऊन वेल्हे गावाच्या दिशेने पळवले.
 |
| वेल्हेमधील गणपती मंदिर |
वेल्हेमधील गणपती मंदिरात रात्री
१ मस्त ताणून
दिली उद्याच्या लांबलचक
तंगडतोडीसाठी विश्रांती आवश्यक होती.
सकाळी ५च्या सुमारास
रुप्याने सर्वाना उठवलं गाड्या
काढून वेल्हेतुन केळद
पासली गावाच्या वाटेला
लागलो थंडी अशी
नव्हतीच पण सकाळचा
गार वारा शरीराला
बोचत होता.
कुसूरपेठ
गाव मागे टाकून
एकलगाव जवळील कातळात खोदलेल्या
टाक्या पाशी आलो
थोडं फ्रेश झालो
तिथंपर्यंत सूर्यदेवानी गुलाबी रंगाची
छटेची आकाशात उधळण केली
होती.
 |
| कुसूरपेठ कडून एकलगाव कडे जाणारा रस्ता |
 |
| तोरणा राजगड |
 |
| एकलगाव जवळील पाण्याचं टाकं |
पाण्याच्या पाठपिशव्या
भरून गाड्या कुसूरपेठ
जवळील टेकडीवरून डावीकडील
कच्या रस्त्यावरून एका
मोकळ्या पठारावर आलो येथून
जेवढे आत गाड्या
जाता येतील अश्या
ठिकाणी गाड्या लावून भीकनाळेच्या
वाटेकडे लागलो.
भिकनाळेची वाट
एका उंच पठारावरुन
खाली उतरते हे
आम्ही जाणून होतो
शिवाय फडताडची वाट
आम्ही गाड्या लावल्या
होत्या त्याच्या खालून १०
ते १५ मिनिटावर
होती त्यामुळे फडताड
केल्यानंतर जास्त चालायचे श्रम
नव्हते.
 |
| भीकनाळेची मळलेली वाट |
 |
| दुर्गाचा माळ लिंगाणा रायगड |
बिगर वाटाड्या
आम्ही जिपीएस वर
वाट शोधून भीक
नाळेच्या वाटेला लागलो तेव्हा
सकाळचे ७:
४५
वाजले होते.
वाट
मळलेली होती शिवाय
वाटेवर जास्त कारवी नव्हती
२/
३ टेपाडयांना
ट्रॅव्हर्स मारून जातो तेच
वाट कारवीत गायब
झाली.
इकडे तिकडे
शोधाशोध केली मागे
गेलो तरी वाट
सापडतं नव्हती शेवटी गूगल
काकांना हाक दिली
तेही नीट सांगेन
वाट नक्कीच वरच्या
अंगाला होती हे
मी नकाशा वाचन
करताना पाहिलं होत.
कारवीत
थोड़ी घुसखोरी करत
वरती आलो तेच
समोर भीक नाळेने
समोर दर्शन दिले
अजून वरच्या अंगाला
५० मीटर चढाई
केली तेव्हा भीकनाळ
आणि फडताड मधील
क्रेस्टलाईनवर आलो.
 |
| भीकनाळ जननीची नाळ क्रेस्टलाइन समोर फडताड नाळ |
 |
| भीकनाळेंची वाट |
इथे
आजुबाजूचा सर्व प्रदेश
उलगडला आणि पुढील
५ मिनिटांत योग्य
वाटेवर आलो तेव्हा
कुठे गूगल काका
ध्यानावर आले.
इथून
पुढील वाट मळलेली
असल्याने वाट चुकण्याची
शक्यता नव्हती गाड्या लावल्यापासून
भीकनाळेच्या मुखाशी येण्यासाठी तब्बल
दीड दोन तासाची
चाल केली ९:
३० वाजता
भीकनाळेच्या मुखाशी सकाळचा नाष्टा
आटपून पुढील वाट
उतरू लागलो.
 |
| भीकनाळ प्रवेश |
 |
| भिकनाळेतील घसारा |
भिकनाळेत
घसारा खूप त्यामुळे
एक एक पाऊल
संभाळून टाकत पुढे
निघत होतो समोर
फडताड आमची वाट
लागायची जणू काही
तयारी करत होती
असं भासत होत.
एव्हाना सूर्यदेवांची सूर्य किरणे नाळेत
पोचली होती आता
१०० ते १५०
फूट उतराई झाली
असताना मधेच एका
१० ते १५
फुटी कातळटप्प्याने वाट
अडवली बरोबर रोप
असल्याने तो कातळटप्पा
आरामात आणि सावधगिरी
ने पार करत
पुढील वाटेला लागलो.
 |
| समोर डावीकडे फडताड तर उजवीकडे जननीची नाळ |
 |
| भिकनाळेतील कातळटप्पा |
 |
| भिकनाळेतील कातळटप्पा |
वाटेत अजून एक
छोटा कातळटप्पा पार
करून भीकनाळेच्या शेवटच्या
टप्यातील झाडी आणि
मोठ्मोठ्या वेलीतून वाट काढत
दरीच्या समोर आलो.
समोर वाट अशी
नाहीच भीकनाळेची वाट
उजवीकडून येणाऱ्या एक नाळेला
भेटते इथे थोड़ा
वेळ आराम करून
भिकनाळेतून उजवीकडील नाळेच्या वाटेला
लागलो.
 |
| भिकनाळ येथून उजवीकडील नाळेच्या वाटेला भेटते |
 |
| समोर भिकनाळ, जननीची नाळ |
उजवीकडील नाळेत जसा
प्रवेश केला तसं
उन्हाचा त्रास सर्वाना जाणवू
लागला पटापट एकावर
एक टप्पे पार
करत फडताड नाळेच्या
मुखाजवळ आलो तेव्हा
घड्याळात दुपारचे १२:
३०
वाजले होते.
एवढ्या
वेळात एक छोटी
घटना घडली ती
म्हणजे रुप्या ज्या दगडावर
उभा होता तो
खाली निसटला आणि
खाली घसरल्याने त्यांच्या
उजव्या पायाला छोटीशी दुखापत
झाली त्याला प्रथमोपचार
करून आणि सर्वानी एकत्र जेवण
करून अमोलच्या मित्र
सुमित बरोबर पणदेरी गावाकडे पाठवले.
 |
| फडताड नाळेची सुरवात |
 |
| जेवण करताना |
आता
राहिलो आम्ही चौघे मी,
विश्राम, अमोल आणि
विनोद फडताडच्या
वाटेला लागलो पाणी कमी
असल्याने "फडताड पुढच्या वेळी
करू या का"
असा प्रश्न डोक्यात
भुणभुणवायला राहिला. फडताडच्या
नाळेतून २०० मीटर
चढाई झाली होती
एव्हाना सर्वाना ज़ोरदार धाप
लागली होती
 |
| मार्च महिन्यातील रणरणत्या उन्हात फडताडची चढाई |
 |
| सावली भेटली कि ५/१० मिनिटांचा विसावा |
 |
| दुपारचे २ च्या सुमारास जोरदार चढाई |
फडताडच्या
नाळेच्या डावीकडील नाळ चढून
उजवीकडील फडताडच्या नाळेपाशी येण्यासाठी
ट्रॅव्हर्स जवळ आलो
तेव्हा दुपारचे २ वाजले
होते. वाट ८०
अंशा मध्ये वर
चढत होती आम्हां
चार जणांकडे ४
बाटल्या पाणी होती
त्यात मी माझ्याकडील
एक राखीव बाटली
मी लपून ठेवली
होती सूर्य देव
आपलं काम चोख
बजावत होता पण
आम्हांला उजवीकडील ट्रॅव्हर्स मारायची होती बाकी होती
ती वाट सहजासहजी सापडत नव्हती.
शेवटी एकेठिकाणी मी
धाडसी निर्णय घेत
विश्राम जवळ बॅग
ठेवून एक कातळटप्पा
चढून वर जाताना
शेवटच्या टप्यात हातातील
दगड निसटला विश्राम
खाली असल्याने लागलीच
त्याला जोरात हाक दिली
"दगड येतोय बाजूला हो"
आणि मी त्या
दगडाच्या बाजूला कातळात असलेल्या
छोट्या पिंपळाच्या झाडाच्या खोडाला
लटकून राहिलो दोन्ही
हात छोटया झाडाच्या
खोडाला आणि पाय
दरीत लटकत होते.
२मिनिटासाठी डोळ्यासमोर अंधारी आली
आईबाबांचा चेहरा समोर दिसू
लागला भान न
हरपता हळूच पाय
कातळटप्प्यावर टेकवले विश्राम खालून
जोरजोरात हाक मारू
लागला. मी ठीक
आहे म्हणून त्या
जागेवर २मिनिटे शांत तसाच
कातळाला चिटकून राहिलो मग
परत एकदा जोर
लावून चढाई केली.
 |
| या घसरणीच्या टप्प्याच्या खाली तो कातळटप्पा लागतो |
 |
| या त्रिकोणाच्या डावीकडे फडताडची नाळ |
हातात जे येईल
ते पकडत हातात
काटे घुसलेले असताना
त्या ट्रॅव्हेसी वर
त्रिशंकू होऊन कसेतरी
घसरणीचा टप्पा पार केला
त्या टप्यावर एक
तरी चूक झाली
असती तर सरळ
२००/
३०० मीटर
सरळ घळीत गेलो
असतो एक हिरवे
गार झाडाच्या सावलीत
२मिनिटे शांत पडलो
खालून विश्राम आणि
विनोद चा आवाज
येऊ लागला होता.
त्या दोघांनी माझी कातळटप्प्यापाशी झालेली
बेक्कार अवस्था पाहिली होती वरच्या बाजूने अमोल
माझ्या वरच्याला धारेवर आला
होता समोर फडताडची
मुख्य नळी दिसत
होती त्या नाळेत
प्रवेश करण्यासाठी अजून एक
छोटासा घसाऱ्या ट्रॅव्हर्स मारायचा
होता.
 |
| फोटो मध्ये दिसतंय तेवढं साधंसुधं उतरणं नव्हतं ते |
 |
| फडताडची मुख्य नाळ |
लगेच विश्राम
आणि विनोदला वर
बोलावून घेतलं त्या दोघांनी
रोपचा पुरेपूर वापर
करत तो टप्पा
आरामात पार केला
पोटभर
पाणी पिऊन पुढच्या
ट्रॅव्हेसीला लागलो तेव्हा घड्याळात
४ वाजले होते
पटापट तो मुरमाळ
मातीचा आणि गवताळ
टप्पा पार करून
फडताडच्या मुख्य नाळेत प्रवेश
केला.
नाळेत प्रवेश
केला खरा पण
नाळेतील दगड आणि
पायाखालील निसटती माती यामुळे
अजूनच तारांबळ उडाली
त्यांत मार्च
महिन्यातील रणरणतं उन्ह शरीराची
काहली करत होत
जणू त्यात भर म्हणून
आता सर्वांकडील
पाणी संपलेलं होत.
 |
| फडताड नाळ |
फडताड आम्हा सर्वांची चांगलीच परीक्षा घेत होती एखाद्या बैलासारखी मान खाली घालून पुढील चढाईला लागलो १० मिनिट चढाई करताच धाप लागत होती शरीरात पाण्याची कमतरता भासू लागली होती ओठावर शुष्कता आली होती कसेतरी मजल दरमजल करत फडताड नाळेच्या ३० ते ३५ फुटी कातळटप्प्या जवळ आलो.
 |
| डावीकडील नळीतून उजवीकडील फडताडच्या मुख्य नळीत येणारी ट्रॅव्हेसी |
 |
| फडताडचा कातळटप्पा |
खरं पण कोणालाही
तो कातळटप्पा चढाई
करायची इच्छा नव्हती कारण
हि तसंच शरीरात
पाणी कमी असल्याने
डीहाड्रेशन ची लक्षणे
जाणवू लागली आता
माझ्या जवळील राखीव बाटलीची
वेळ आली.
ती
बाटली समोर काढताच
सर्वांचा आनंद व्दिगुणित
झाला ४ जनात
ती पाण्याची बाटली
वाटून तो ३०
ते ३५ कातळटप्पा
लीलया पार केला
तेव्हा संध्याकाळचे ६:
३०
वाजले होते कातळटप्प्यावरील
घसारा चढून खिडीत
आलो आणि सरळ
आडवे झालो.
 |
| फडताड फत्ते |
 |
| फडताड नाळेच्या कातळटप्पा सर करून वर आलो तेव्हा |
खिंडीत
मस्त गार वारं
सुटला होता समोर
काळोखात रायगड,
लिंगाणा तर बोराट्याची
नाळ असा प्रदेश
दिसत होता १०/
१५ मिनिटांनी भानावर
आलो अजून २
तासांची चाल बाकी
होती आणि पाण्याचा
ठणठणाकं होता. खिडीतून
उजवीकडील घाणेरड्या घसाऱ्याची वाट
पकडली धापेवर धाप लागत
होती पण आम्ही
चौघे काही हार
मानत नव्हतो जननीच्या
पठारावरून जननीच्या ठाण्याजवळ आलो
मनोमन हात जोडले
त्या जननीला तेव्हा
सांजवेळचे ७:
३०
वाजले होते.
 |
| फडताडच्या खिंडीतून दिसणारे मोहक द्रुश्य |
 |
| फडताडचा शेवटचा घसरणीचा टप्पा |
 |
| जननी माता |
आता
पाय मागे खेचू
लागले होते एकमेकांना
प्रोसाहन देत पुढे
जात होतो वाटेमधील
कारवी शरीरावर असंख्य
ओरबडे काढत होती
पण त्याची आम्हांला तमा नव्हती आमचं ध्येय
एकच कसतरी गाड्याजवळ
पोहचणे.
वाटेतील एका पठारावर
१० मिनिटे पडीक
मारली आयुष्यातील सुखद
क्षण काय असतील
हे ते १०मिनिट असतील त्या निर्भीड
जंगलात आम्ही ४ भूत
एवढे शांत झोपलो
होतो कि कोणतं
प्राणी तरी जवळ आलं असतं
तरी त्याला आमच्या
वर दया आली
असती.
शरीरातील सर्व जोर
एकटवुन कसेतरी उभे राहून
सर्वजण पुढील चालीसाठी
सज्ज झालो कोणीही
काही न बोलता
शांततेत पाय ओढत
चालत होते.
लांब
एकलगावातील कुत्रं भुंकत होत
एक टेपाड पार
करून सहज मोबाईल
बाहेर काढला पाहतोतर
गूगल काका बोलत
होते तुमच्या गाड्या
तुमच्या वरच्या अंगाला आहेत
लगेच एकलगाव कडील
सरळ जाणारी वाट
सोडून उजवीकडील वाटेला
लागलो.
१०/
१५
मिनिटांची छातीवर येणारी चढाई
कोणत्या आनंदात पार
केली देव
जाणो आमच्या सर्वान
मध्ये हे बळ
कुठून आलं आमचं
आम्हांलाच
माहित नव्हतं समोरील
झाडीपार करून वर
आलो तर गाड्या
५ मिनिटावर होत्या.
आतापर्यंत न
केलेला जल्लोष आता आम्ही
चौघानी केला अमोल आणि मी गाडी काढून एकलगावच्या
दिशेने निघणार तेच विश्रामच्या
लक्षात आले कि
रुपेशकडून गाडीची चावी घेतलीच
नाही.
आता काय
करावं सुचत नव्हतं
सर्वात शेवटी पहिलं पाणी
पिऊ मग गाडीचं
काय करायचं ते
बघू हा निर्णय
झाला मी अमोल
त्याच्या बाईकने
एकलगाव कडे निघालो.
टाकी जवळ येऊन
पहिलं पोटभर दोन तीन बाटल्या
पाणी
आम्ही दोघांनी रिचवलं
आणि ५ बाटल्या
भरून जिथे गाड्या
लावल्या होत्या तिथे येताना
माझ्या मोबाइलला रेंज आली
पाहतो तर रुपेशचा
मेसेज गाडीची चावी
माझ्याजवळ आहे मी
पणदेरी महाड भोर
करून नसरापूर फाट्याजवळ
आलोय.
वाह मानलं
भावाला लगेच २
गाड्या काढून वेल्हे गाठले
तिथून अमोलने
आमचा निरोप घेऊन
भोरकडे निघाला
आणि विनोद रुपेशला
आणण्यासाठी नसरापूर फाट्याला निघाला.
मी आणि विश्राम
गणपती मंदिरात मस्त
ताणून दिली रात्री
१२:
३० वेळी
विनोद रुपेशला घेऊन
वेल्ह्यात आला या
दोघांनी मस्त हॉटेल
मधून डाळ खिचडी
आणि शेवयाची भाजी
आणली होती.
जेवण
करून ४जणांनी मंदिरात
ताणून दिली सकाळी
७ ला विश्राम
आणि रुपेश एकलगाव
मधून गाडी घेऊन
आले सर्व फ्रेश
होऊन नास्ता करून
मुंबईच्या दिशेने गाड्या भरधाव
सोडल्या पण मन
मात्र अडकलं होत
फडताड नाळेवर. आजपर्यंत
केलेल्या भटकंती मध्ये अशी
दमच्याक कोणत्याही नाळेंनी केली
नव्हती जी फडताड
ने केली हे
क्षण सदैव मनात
घर करून राहणार हे गडकिल्ले आणि घाटवाटा जणू काही आमचा प्राणवायूच... आठवडाभर कामाने त्रासलेला जीव, आपला उत्साह, स्फूर्ती परत मिळवण्यासाठी या गडकिल्ले आणि घाटवाटाच्या सानिध्यात येत असतो. आणि इकडून मिळणारी एक अनोखी ऊर्जा संपादन करून नव्या उमेदीने रविवारी रात्री उशिरा घरी पोहचून सोमवारी सकाळी कामावर रुजू होत असतो हीच तर आहे भटक्यांच्या जीवनातील खरी गंम्मत.....
भावा अप्रतिम पुन्हा तो सर्वं रोमांचक, साहसी आणि एकजुटीचा प्रवास अनुभवला तुझ्या वाचनातून 👌💪🙏
ReplyDelete