Monday, 18 June 2018

भटकंती पेठ किल्ल्याजवळच्या ४ घाटवाटांची (भाग-१)


                       भटकंती पेठ किल्ल्याजवळच्या ४ घाटवाटांची 

(बैलदारा,फेण्यादेवी,कौल्याची धार आणि नाखिंदा घाटाची)  
रायरेश्वर ते महाबळेश्वर ट्रेक केल्यानंतर आमच्या पायगाडीने जास्त चाल चालली नव्हती त्यामुळे कुठे तरी ट्रेक करायाला जाऊया असा नारा विश्राम आणि रुप्या ने लावला होता. तसे प्लॅन माझ्याकडे तयार होते पण ट्रॅव्हल व्यवसायमुळे कुठे जायला मिळत नव्हते शेवटी जुनच्या आणि १०ला २दिवस घाटवाटा करायचा आमचा प्लॅन होता. पण येन वेळी पाऊसाने जोर धरल्याने प्लॅन फसला सर्वच नाराज झाले होते. कारण हि तसेच होते रायरेश्वर ते महाबळेश्वर ट्रेक केल्यानंतर जास्त ट्रेक झाले नव्हते पण कोणीच हार मानता कोणत्याही स्तिथीत १६ आणि १७ तारखेला जायचंच ठरलं. ठरल्याप्रमाणे १५ तारिखला रुप्या आणि मी अंधेरी वरून बाईक वरून विश्रामच्या घरी निघालो यावेळी ट्रेक मध्ये नवीन गडी होता सचिन कदम तोही ऑफिस मधून लेट निघून विश्रामच्या घरी रात्री १वाजता पोचला तिथं पर्यंत आमच्या ट्रेक मधील गप्पा चालूच होत्या सच्या आल्याने त्यात भर पडली आणि सकाळचे वाजता संपली. आम्हांला वाजता  घरातुन निघून कर्जत करून पेठ किल्ल्याजवळ  सकाळी पर्यंत पोचायचं होत पण उठायला वेळ झाल्याने सकाळी तिथे वाजले लागलीच फ्रेश होऊन जवळच्या पानपट्टी वर चहाचा झुरका मारून गाड्या कर्जतच्या दिशेने पळविल्या पाऊस चिरीमिरी पडत नाटक करत होता. चौक मध्ये पोटघर मिसळ हादड्ल्यावर परत गाड्या तुफान पळवत आंबिवली गाठली तेव्हा सकाळचे वाजून २० झाले होते आता आमच्या रायडर लोकांनी गाड्या थेट पेठ किल्ल्याच्या पायथ्याशी पोचवून अमूल्य वेळ वाचवला पेठ मध्ये पोचलो तेव्हा ८वाजून ४० मिनिटे झाली होती.
पेठच्या पठारावरून दिसणारा पेठ किल्ला  
हनुमान मंदिराच्या समोरील घराजवळ गाड्या नीट लावून पेठकिल्ल्याच्या वाटेला लागलो. यावेळी सचिन नवीन होता त्यामुळे त्यांचा खरा कस लागणार होता तसं पाहायला गेलं तर सर्वांचाच कस लागणार होता कारण जानेवारी ते मार्च पर्यंत मोठे ट्रेक केले होते पण एप्रिल आणि मे घरीच असल्याने चांगला घामटा निघणार होता आमच्या चारही जणांनचा. गडाची वाट उजवीकडे सोडून सरळ चालू लागलो थोडे पुढे गेल्यावर डावीकडे नवीन बांधणीतले टुमदार घर पाहून पुढे निघालो 
पेठवाडीतील शेवटचं घर जिथून एक वाट किल्ल्यावर आणि एक सरळ खिंडीकडे जाते 

 उजवीकडे पेठच्या किल्ल्याचे कातळकडे तर समोर नाखिंदा डोंगरावरच्या पवनचक्क्या 
समोर नाखिंदा डोंगरावरच्या पवनचक्या जेट विमान जातो तश्या आवाज करत होत्या. आता वाटेला फाटे फुटले होते पेठ वाडीतून १५ मिनिटांत या फाट्याजवळ पोचलो होतो डावीकडची वाट नाखिंदा घाटाकडे जाते (नाखिंदा घाटाच्या वाटेला पुढे पठारावर वाट फुटतात एक पदरातून अंधारी घाटाला जाते तर दुसरी नाखिंड घाट चढून घाटावर जाते
पहिले २ फाटे डावीकडे नाखिंदा घाटाला जातो तर उजवीकडची वाट खिंडीत
आम्ही उजवीकडील वाट पकडली हि वाट खिंडीत जाते पण इथे एक लक्ष्यात ठेवायला लागते ते म्हणजे खिंडीत जाण्या आधी या वाटेवरही डावीकडे एक वाट जाते हि वाट कौल्याच्या धारेला जाते. तसं पाहिलं तर आमचा कौल्याची धारेचा प्लान होता पण उगाच धावत पळत ट्रेक करण्यात मज्जा नाही म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशीसाठी या घाटवाटा ठेवल्या होत्या. कौल्याच्या धारेच्या फाट्याला डावीकडे सोडून खिंडीत आलो
खिंडीतील ३ वाटा उजवीकडे पेठकिल्याच्या मागे जाते दुसरी सरळ जाणारी मेचकरवाडीत आणि डावीकडे पदरातून कळकराई वाडीत   
तेव्हा खिंडीत वाटा होत्या डावीकडची पदरातून कळकराई वाडीत जाते तर उजवीकडची पेठ किल्ल्यावर आणि समोरची वाट खाली उतरत मेचकर वाडीत जाते. आम्हांला कळकराई वाडी गाठून बैलदारा घाट करून फेण्यादेवी घाटाने उतरायचा प्लॅन होता त्यानुसार आम्ही डावीकडची वाट पकडली वाट आता गर्द झाडीतून जाऊ लागली डावीकडे कौल्याच्या धारेची डोंगररांग उंचच उंच होत गेली होती. जास्त चढ उतार नसल्याने डावीकडे उजवीकडे पाहत आरामात चालत होतो मधेच एका ठिकाणी पेठच्या किल्ल्याने दर्शन दिले. आता वाट एका ओढ्या जवळ ओलांडून पुढे गेली
घनदाट जंगलातील वाट

लागलेला ओढा
पण पुढे वाटच दिसेना शेवटी थोडं पुढे शोधा शोध करत १० मिनिटात खालच्या अंगाला एक निमुळती वाट पकडून पुढे जाऊ लागलो तशी वाट मोठी होत गेली जंगलातून एका पठारावर आलो तेव्हा उजवीकडे पठारावर पेठ किल्ला,

खाली मेचकरवाडी धामणी गाव, डावीकडे कळकराईवाडी असा भला मोठा पॅनोरमा दिसत होता शिवाय डोक्यावर नाखिंदाच्या पवनचक्या आवाज काढतच होत्या. आधल्या दिवशी पाऊस पडून गेल्यानी मच्छर लोकांनी आमची पार साल काढली होती नाखिंड डोंगरावरून एक ओढा लागला ओढ्यालाजूनहि पाणी होत हा ओढा पार करून कळकराई पठारावर आलो वाट पार छान आहे कुठेही चुकण्याचा संभव नाही

हा ओढा पार करून आपण पदरातून काळकाईवाडी कडे वाट फिरते व पेठ किल्ला आणि नाखिंदा आपल्यासमोरील पठारांवर दिसतात  
मी पुढील ट्रेकचे प्लॅन करत पुढे चालत होतो सच्या खूप खुश होता बरेच दिवसांनी काही वेगळं पाहायला भेटतंय म्हणून तर रुप्या आणि विश्राम फोटोग्राफी मध्ये दंग होत मागून येत होते

सकाळचे :४० झाले होते तब्बल एक तास ते पण आरामात आम्हांला धावत पळत कुठे मॅरेथॉन करायची नव्हती. पाऊस मधेच कुठे हलकी सर मारून जात असे वार्तावरण खूपच रमणीय झालं होत. उजवीकडे गुरं बांधण्यासाठी एक झाप दिसलं झापाच्या मागे एक दादा मोळ्या बांधत होते त्यांच्याशी वाटेबद्दल विचारपूस केली असता दादा आमच्या बरोबरच निघाले.

झापपासून ते १० मिनिटावर दादांनी डावीकडची वाट घेतली आम्ही थोडं अचंबित झालो दादांना विचार कि एक चौक लागतो तिथून डावीकडे वाट बैलदाराला जाते. दादा थोडे हसतच पुढे निघाले आणि २मिनिटात त्या चौकजवळ आम्हांला उभं केलं 
डावीकडील वाट पुरातन विहिरीकडे तर सरळ बैलदारा घाटाकडे तसेच उजवीकडे खाली सरळ जाणारी कळकराई वाडीत 
आम्ही बोललॊ दादा पुरातन विहीर कुठे आहे तर दादांनी सांगितले डावीकडची वाट विहिरीकडे आणि तिथूनच पुढे बैलघाटाने तळपेवाडीला जाते पण थोडी शोधा शोध करावी लागते चौकांतून सरळ जाणारी वाट बैलदारा घाटातून सावळा आणि मळेगाव मध्ये निघते तर सरळ जाणारी कळकराई वाडीत आणि खाली उतरणारी मेचकरवाडीत. दादांनी आम्हांला डावीकडे पुरातन विहीर जवळ आणून सोडले आणि निरोप दिला दादांना मानधन देण्यासाठी हात खिशात घालणार तर दादा मागे होऊन बोलले याची काहीही गरज नाही तुमच्या सारखे भटके या रानावनात भटकतात आणि त्यांनी हा निसर्गाचा ठेवा बघावा एवढीच इच्छा दादांशी बोलून विहीरीपाशी आलो
 पुरातन विहीर

तिथंपर्यंत या तिघांचं फोटोसेकशन झालं होतो दादांचं नाव विचारलं तर शंकर दादा हे कळलं. खरंच गावातील माणसं वेगळीच मोठ्या आणि साफ मनाची असतात विहिरीजवळून परत आम्ही त्या चौक जवळ आलो. फाट्यावरून आम्ही डावीकडे बैलदारा घाटाच्या वाटेला लागलो एव्हाना सकाळचे ११:३० वाजले होते आता भर उन्हांत घाट चढायला लागणार होता
घाटाचा पहिला टप्पा
घाटाची पहिला टप्पा मस्त जंगलातून होता पण खड्या चढणीचा तो पार करून दुसऱ्या टप्प्यावर वाट नाळेतून जाऊन लागली पाऊसात बैलदारा घाटवाट करताना थोडं अवघड समजा. आता सचिनची हालत खराब होऊ लागली त्यात सकाळी केलेला मिसळपावचा नास्टा कधीचा जिरून पाणी झालं होत आणि त्यात भर कडक उन्हात नाळेमध्ये दमटपणा जाणवू लागला अंगातून पार घामाच्या धारा येऊ लागल्या तरी हळू हळू दम खात नाळ पार करून परत झाडीभरल्या वाटेवर आलो
 दुसरा टप्पा नाळेतील चढाई 
सच्या थॊड मागे पडल्यामुळे हळू हळू वर चढत गेलो तोंडात लिमलेटची गोळी टाकल्या बरोबर नवीन संजीवनी भेटल्यासारखं वाटलं घाट चढून वर येताच थंड वाऱ्याच्या झुळकेने स्वर्गात आल्यासारखं वाटलं. रुप्या आणि सचिनने तर मस्त ताणून दिलानी. 
थकलेले सचिन दादा


विश्राम दादांनी आपल्या बॅगमधील केक काढताच दोघांचे चेहरे पाहण्यासारखे होते. खरंच सर्वांचं मनोमन कौतुक वाटलं भिडू लोकांनी बैलदारा घाट तब्बल ३० मिनिटांत पार केला होता. आता घाटावर कडक उन्हं जाणवू लागली बैलदारा चढून आलो तेव्हा आम्हांला वाटा लागल्या एक डावीकडे तर एक उजवीकडे जात होती डावीकडची वाट तळपेवाडी जाते तर उजवीकडची वाट सावळा गावाला आम्ही उजवीकडची वाट पकडून चालू लागलो
सावळा गावाकडे गेलेली वाट 

बैलदारा घाटाकडून डांबरी रस्त्यावर येताना
त्यावाटेवरून जाताना बरेच शेती पार करून आम्ही पक्क्या सडकेवर आलो. एकाठिकाणी झाड बघून सोबत आणलेला सुका मेवा खाऊन जवळील एका घरातून पाणीच्या बाटली भरून सावळा गावात पोहचलो तेव्हा घड्याळात दुपारचे १२:४५ वाजले होते. आम्ही आरामात चाल करत मेटलवाडी जवळ आलो इथे एका मामांना फेण्यादेवीची वाट विचारून पुढे गाडी रास्ता सोडून मेटलवाडीच्या आधीच उजवीकडे वळलो. थोडं पुढे शेतीच्या बंधाऱ्या वरून चालत जात असताना फेण्यादेवीच्या घाटाची घळ उजवीकडे लागू लागली.
 फेण्यादेवी घाटाची सुरुवात 


खाली उतरत असताना हवेत थंडावा जाणवू लागला फेण्यादेवीची वाट पाहून मला ठिपठिप्या घाटाची आठवण झाली थोडं फोटोसेकशन करून आरामात खाली उतरत होतो. डावीकडे बहुतेक दगडांना शेंदूर फासून ठेवलाय याच ठिकाणाला फेण्यादेवीचं ठाणं असे म्हणतात. तसे प्रत्येक घाटवाटेवर कोणत्या ना कोणत्या देवीचं किंवा देवाचं ठाणं असतं. आम्ही केलेल्या या घाटवाटाच महत्व मी तुम्हांला शेवटला सांगेन असो फेण्यादेवीच्या ठाण्यापासून खाली उतरत चाललो उजव्या बाजूने फेण्यादेवीचा ओढा सतत साथ देत असतो पावसात फेण्यादेवी घाटाला जाणे टाळाच कारण १००मीटर उतराई केल्यानंतर हा ओढा उजवीकडून डावीकडे घळीत उडी घेतो.
डावीकडून उजवीकडे जाणारा ओढा याच ओढ्यातून पाईप लाईन द्वारे कळकायरीच्या वाडीत पाणी आणलं आहे  

वाट उजव्या हाताला वळते
त्यामुळे थोडी खबरदारी घेत हा ओढा पाऊसात पार केला तर बाकी फेण्यादेवीची वाट खूपच सूंदर आहे. हा ओढा पार करत असताना लागलेली पाईप लाईन आपल्याला घाटवाटेमध्ये सतत साथ देत असते पाईपद्वारे कळकराई वाडीत पाणी पुरवठा करन्यासाठी हि लाईन टाकली आहे. आता वाट उजवीकडे जंगलात वळली थोडं जंगलातून बाहेर आल्यावर सहयाद्रीच्या सणसणीत कड्यांचं दर्शन झालं



दोन्ही बाजूच्या कातळभिंती आता दूर जाऊ लागल्या समोर पिंपळपाडा आणि कोकणातील इतर गावाचं दर्शन झालं. एव्हाना दुपारचे वाजून १० मिनटे झाली होती तसा आम्ही आरामात चालत होतो 
सचिन आणि रुप्या दादा मस्त फोटोग्राफीचा आनंद घेत चालले होते


वाटही सुरेख मळलेली होती आणि कुठेही फाटे फुटलेली सरळ कळकराई वाडीत उतरणारी आम्ही उतराईचा आनंद घेत पदरात आलो. एक दोन ठिकाणी आम्ही थांबलो कारण हि तसंच होत बहुतेक ठिकाणी केलेली जंगलतोड़ मन थोडं हिरमुसलचं जड पाउलांनी पुढे चालू लागलो वाटेत दोन गावातील माणसे दिसली त्यांना ते १० मिनिटांत कळकराई वाडी पोहचु असे सांगितले
फेण्यादेवी घाटाची वाट या डोंगराच्या उजवीकडून उतरते 
बरोबर :३० वाजता कळकराई वाडीत पोहचलो वाडीतील एक ताईंना चौधरवाडीची वाट विचारून पदरातून खाली उतराई करण्यासाठी निघालो. ताईनी सांगितल्याप्रमाणे कुठेही डावीकडे वळू नका उजवीकडची वाट पकडून चाला तसे आम्ही योग्य वाटेवर होतो कारण १० ते १५ मिनिटांत आम्हाला चौधरीवाडी आणि धामणी गाव खाली दिसू लागले
चौधरीवाडी आणि धामणी गाव
वाटेवर एका ठिकाणी थोडा विसावा घेत परत खाली उतरू लागलो पूर्ण ट्रेकमध्ये नुसत्या पुढील ट्रेक तसेच त्या परिसरातील इतिहास आणि भूगोलावर चर्चा चालू होती. हि वाट हि सुरेख आणि मळलेली होती बहुतेक वाडीतील लोक याच वाटेचा उपयोग करत असतील. पुर्णपणे निसर्गावर अवलंबून तसेच दैनंदिन गरजेच्या सामानासाठी मुख्य गावात ये जा करण्यासाठी सहाजिकच इथल्या घाटवाटांचा वापर सोयीचा. जसे की पेठ गावाजवळची नाखिंडा घाटाची वाट जी देशावरच्या भामा खोर्यातल्या वांद्रे गावात जाते. पेठच्या किल्ल्याला बिलगुण असणारी सरळसोट निमुळत्या सोडेंची अशी कौल्याची धार या वाटेने वांद्रे गावात पोहचता येते. मग दक्षिणेलाबैल घाटआणखी थोडे पुढे जातपायरी घाटआणिफेण्यादेवी घाटया सर्व प्रमुख घाटवाटा. त्यात बैल घाट आणि पायरी घाट हे पेठवाडी आणि कळकराई यामधील जंगलातल्या पदरातून निघून अनुक्रमे तळपेवाडी आणि सावळा जाण्यासाठी स्थानिक गावकरी अजुनही वापरतात
कळकराई वाडीतुन चौधरीवाडीत उतरणारी वाट 
आम्ही तसेच काही उतरून बरोबर वाजून १५ मिनिटांत चौधरीवाडीत पोहचलो गावात पोहचताच एका मामांशी वाटेबद्दल बोलणं केलं तेव्हा त्यांनी ह्या वाटेला गायदरा असे म्हणतात तर अजून एक वाट आहे ती म्हणजे नाळेची. पावसात बहुतेक वाडीतील लोक गायदरा सोपी असल्याने तिचा उपयोग करतात मामांना निरोप देऊन पुढे धामणी गावात निघालो.
धामणी गावाकडे 
वाटेत उजवीकडे तसेच खूप ठिकाणी गावातील लोकांनी फार्म हाऊससाठी बड्या लोकांना जागा विकल्याचे निदर्शनास आले त्यावेळी खूप वाईट वाटले. गावात आल्यावर नाळेच्या वाटेची थोडी चौकशी एका दादाने वाट पार मोडली आहे असं सांगून आमचा प्लॅन वर पाणी टाकायचं प्रयन्त केला पण आम्ही कुठून कोणत्या घाटवाटांची चढाई उतराई केलेलं ऐकल्या बरोबर बाजूचे वयस्कर बाबा बोलले "वाटेला लावून दया रे पोरांना ती आपल्यासारखी लय जंगल तुडवतात". बाबांचे मनोमन धन्यवाद केलं. दादा वाट दाखवण्यासाठी तयार झाले आम्ही एका दुकानांत चहाची ऑर्डर दिली सोबत पार्लेजीची प्रत्येकी एक एक बिस्कीट पुडा पोटांत ढकलून रिचार्जे झालो. सचिन दादा परत एकदा चिंताग्रस्त झाले कारण हि तसेच होते सकाळ पासून खूप मोठा पल्ला मारला होता गड्याने त्यामुळे थोडं थकलेला वाटत होता पण गडी लय जिद्दी मला, रुपेश आणि विश्राम असे मोठे ट्रेक करायची सवय होती त्यामुळे आम्हांला फक्त सचिनला सांभाळायचे होते. अश्या घाटवाटांच्या आणि रेंज ट्रेकला एकतरी गडी मोडखळला तरी पूर्ण ट्रेकची वाट लागू शकते. शेवटी दादानं बरोबर निघालो नाळेच्या वाटेवर बहुतेक ठिकाणी फार्म हाऊस असल्याने दादांनी तेथील रखवालदारा बरोबर वार्ता केली त्यांनी आतून जाण्यास परवानगी दिली आता फार्म हाऊस ला वळणं मारून जाण्याचा वेळ आणि श्रम दोन्ही हि वाचले होते
 नळीच्या वाटेकडे  
फार्म हाऊसच्या मागील दरवाजाने बाहेर पडत आम्ही नळीच्या वाटेला लागलो. वाट लगेचच चढणीला लागली सचिन भाऊ थोड़े मागेच पडू लागले त्यामुळे थोड़ थांबत हळू हळू वर चढत होतो. दादांनी ठरल्याप्रमाणे आंब्याच्या झाडाखाली सोडून वाट नीट समजावली. दादांना योग्य ती बिदागी देऊन आम्ही पुढे चाल केली खरी पण दिवस भरच्या मारलेल्या पल्यामुळे थोडा थकल्यासारखे वाटत होते शिवाय वाट उभ्या चढणीची असल्यामुळे छातीचे भाते जोर जोरात वाजत होते
नाळेची वाट   
सचिन खूपच मागे पडल्यामुळे मी थोडं मागे थांबलो विश्राम आणि रुपेश पुढे नाळेच्या खाली आराम करत होते. सचिन थोडसं अंतर राहिलंय असा दिलासा देत नाळेजवळ आणलं आता वरती आभाळं चांगलंच भरून आले होते


त्यामुळे पटापट नाळ चढून वर येताच पाऊसाने जे झोडपलं सांगू शकत नाही पेठ वाडी अवघ्या १० मिनिटावर असताना साहेबांनी पार आतून बाहेरून चांगलंच भिजवलं. भिजतच पेठ वाडीत जिथे जेवणाची सोय आम्ही सांगितली होत्या त्या घराजवळ आलो. घरातील ताईंनी घरात येण्यासाठी सांगितले आणि तुम्ही कापडं बदलून घ्या तिथंपर्यंत मी चाय बनवते असा गोड कटाक्ष टाकला. कपडे वैगरे बदलून गरम चहा घेऊन होईपर्यंत वाजून गेले होते म्हणजे आमचा ट्रेक वेळेच्या तास आधी झाला होता त्यामुळे आम्ही सर्व भलतेच खुश होतो पाऊसाने टिवटिव ने सोडलं नव्हते घरात कंटाळा येऊ लागला म्हणून आम्ही समोरील हनुमान मंदिरात आराम करण्यासाठी निघालो तेव्हा ताईंनी पटकन चटई आणून दिली परत एकदा गावातील चांगुलपणाचा प्रत्येय आला. मंदिरात येताच सर्वानी पडीक मारलानी पहिले आमचे लाडके सचिन दादा आडवे झाले मग चालू झाली दिवसभराची कुठून कुठे कसे आलो यावर विचारांची देवाण घेवाण शिवाय त्या घाटवाटांचं महत्व समजून घेण्याचा प्रयत्न बोलता बोलता माझं लक्ष्य समोरील डोगंरावरील खेताबा मंदिराकडे गेला पुढच्या रविवारी तुझ्या भेटीला नक्की येणार असं मनोमन ठरवून थोडा आडवा झालो. डोळे मिटताच सकाळपासून चाललेच्या वाटेची चित्रफिती दिसू लागल्या मनोमन त्या घाटवाटा नमस्कार केला. पाऊसामुळे गावात लाईट नव्हती मग तर पार गावी आल्यासारखं वाटतं होतं बोलता बोलता रात्रीचे वाजून ३० मिनिट कधी झाले कळलेच नाही. ताईने त्यांच्या मुलाकडे आम्हांला जेवायला येण्याचा निरोप दिला तसे आम्ही लगेच घराकडे धावू लागलो कारण हि तसंच एवढ्या मोठ्या तंगडतोडीमुळे भूख हि जबरी लागली होती. ताईनेही गरम गरम जेवण समोर ठेवताच आम्ही जेवणावर तुटून पडलो खूप दिवसांनी मनसोक्त जेवून बाहेर थोडं शतपावली करून घरात आलो तेच दादांनी आमच्यासाठी अंथरून घालून ठेवलं होत खरंच मानलं गावातील माणसांना एखाद्याला एवढा जीव लावतात कि आपण त्यांचे उपकार कसे फेडावे हेच कळत नाही. थांबलेला पाऊस परत एकदा आपल्या हलक्या सरी पडत पुढे जात होता आता थोडी थंडी वाटू लागल्यावर आम्ही आपआपल्या चादरीत ताणून दिली. पाऊसाने आता चांगलाच जोर धरला होता पत्र्यावर ताशे वाजवू लागला होता रात्री कोणी एका ग्रुपचा लीडर ताईंचे दार जोरजोरात ठोकावू लागला. पण दिवसभरच्या थकावट आणि थंडीमुळे तिकडे कानाडोळा करून परत अंथरूनात ताणून दिली

{भटकंती पेठ किल्ल्याजवळच्या ४ घाटवाटांची (भाग-२)}