बिंबनाळ- फणशीची नाळ
१ फेब्रुवारीला आमच्या ग्रुप मध्ये
पोस्ट पडली अस्वलखिंड
ट्रेकला जाऊया सर्वानी होकार
दिला १३ तारीखपर्यत सर्व काही
नीट
होत पण १४
तारीखनंतर एक
एक मोहरा गळायला
लागला. शेवटी राहिलो
तिघे मी विश्राम
आणि विनोद तरीपण
आपण ट्रेक करू
असं असताना अचानक
अमोलचा मेसेज आला. १६
ला बिंब आणि
फणशीची नाळ करतोय
येतोय का मग
काय लागलीच होकार
देऊन टाकला आणि
आमचा अस्वलखिंडचा प्लॅन
पुढे ढकलला गेला.
आता मुंबईहुन भोरला जायचं कस
एसटी कि बाईकने सर्वात शेवटी
विनोदला टोपी देऊन
मी आणि विश्राम
बाईकवरून निघालो.
तसं पाहिलं तर
आमची हालत बेक्कार
होणार होती हे
आम्हाला आधीच माहित
होत पण बोलतात
ना ट्रेकिंगचा किडा
एकदा अंगात शिरला
कि कसलं काय
मग पुढचं पुढे
बघू असं करून
१५ ला संध्याकाळी
७:
३० ला
अंधेरीवरून निघालो.
अमोलचा कॉल
आला निघाले कि
नाही तरी त्याला
पुढे जायला सांगितले
पण त्याने पुढे
जाण्यास नकार दिला.
मग त्या मुंबईच्या
टिपिकल ट्रॅफिक मधून बाईक
आडवी तिडवी करून
वाशीला विश्रामच्या घरी
आलो तिथेच जेवण
आटपून लगेच बॅग
भरून विश्रामच घर
सोडलं तेव्हा घड्याळात
९ वाजले होते.
 |
| विश्रामचे घर |
आता खूपच उशीर
झाला होता गाडी
तशीच पनवेलला आणली
तीच हि पोट
भरून तिला मुंबई-
पुणे जुन्या
महामार्गावर पळवली.
थंडी
आपलं काम बजावू
पाहत होती तरी
तिला न जुमानता
खोपोली गाठली तेही ३०
मिनिटात खंडाळा घाटात थंडी
अजूनच वाढत गेली
आणि आम्हां दोघांची (
विश्राम आणि
माझी) हालत खूप
बेक्कार होऊ लागली.
अमोलला मेसेंज करून ठेवला
पुढे जायचा पण
गडी लय चिवट
तुम्ही या मगच
पुढे एकत्र जाऊ.
घाट चढून एका
चहाची टपरीजवळ
चहा डोसून पुढे
निघालो एव्हाना घड्याळात १०:
०० वाजून
गेले होते.
कसेतरी
रात्री १२:
३०
ला नसरापूर फाट्यावरून
गाडी आत घुसवून
नसरापूर गावात आलो इथे
आम्हांला अमोल,
नितीन मोरे,
घाटवाटा करणारे देवा घाणेकर
यांची भेट झाली.
लागलीच आमच्या गाड्या केळद
च्या दिशेने पळू
लागल्या.
चंद्र प्रकाशात राजगड
व तोरणा खूपच
छान वाटत होते
गाड्या वेल्हात आल्या तिथेच गणपती मंदिरात
आराम करायचा निर्णय
घेतला कारण हि
तसच वाढती थंडी
आणि आम्ही दोघे
खूप थकलो होतो.
मंदिरात पाठ टेकवताच
निद्रा देवीच्या आधीन झालो.
जाग आली ती
सकाळी ५ ला
देवाच्या अलार्मने पण थंडी
चा जोर जास्त
असल्याने आम्ही तसेच पडून
राहिलो. सकाळी ६ ला
उठून गाडीला केळदच्या दिशेने पळविल्या.
पासली फाट्याच्या पुढे
एकलगाव आणि सिगापूर
गावासाठी उजवीकडे
वळलो.
 |
| समोर डावीकडे तोरणा आणि उजवीकडे राजगड |
 |
| लिंगाणा आणि रायगड |
एव्हाना सूर्यदेवाच्या
सोनेरी झळा तोरणा
आणि राजगडवर पडल्या
जबरदस्त पॅनोरमा डोळ्यासमोर उभा राहिला
सर्वजण जमेल तसे
ते क्षण डोळ्यात
आणि कॅमेरामध्ये
बंदिस्त करण्यासाठी धावू लागले.
जास्त वेळ तिथे
न थांबता सिंगापूरला
सकाळी ७:३०
ला पोचलो आजपर्यंत
२५ ते ३०
घाटवाटा केल्या पण सह्याद्रीच्या
या गाभ्यात माझं
पहिलंच पाऊल होत.
सिंगापूर,एकलगाव, मोहरी गाव
कधी सहयाद्रीच्या या
भागात भटकंती करा
तुम्हांलाही वेड लावून
टाकतील अशी जबरदस्त
गाव. गाड्या मामांच्या
घरी लावून वाटाड्या
भेटेल का यांची
देवा ने विचारपूस
मामानंकडे केली
पण कोणी येण्यासाठी
तयार होईना तिथंपर्यंत आम्ही सर्व फ्रेश
झालो होतो. चहा ढोसताना
आम्ही मामांना फक्त वाटेला
लावून द्या बाकी आम्ही
जाऊ पुढची वाट
शोधत जाऊ तसे मामा हि
तयार झाले.
 |
| बिंब नाळेच्या दिशेने दाट जंगलातून वाट |
लागलीच
बिंब नाळेच्या दिशेने
निघालो वाट एक
जुन्या विहिरी जवळून पुढे
जात जंगलात घुसली
आता समोर सह्याद्रीच्या
नाळाचं नाळा दिसू
लागल्या.
मामांना तर एकूण एक नाळेची माहिती ती डोक्यात
घुसेपर्यंत डोक्याचा पार भूगा झाला होता. बिंबनाळ हि आग्यानाळची सखी बहीण फरक एवढाच
कि आग्यानाळ सौम्य उताराची तर बिंबनाळ हि
कातळटप्प्पे आणि सरळ तीव्र उताराची रुंदीला पण मोजकीच समोर फणशीची नाळ, दुर्गाचा माळ,
फडताड नाळेची मागील बाजू दिसत होत्या.
 |
| बिंबनाळेच्या मुखावर मामा वाट दाखवताना आणि इतर नाळेची माहिती सांगताना |
 |
| सिगापूर मधील मामा बरोबर एक आठवण |
मामांना निरोप देऊन खाली उतरू लागलो तेव्हा घड्याळात
८ वाजले होते एक उजवी ट्रॅव्हर्स मारून नाळेच्या तोंडावर आलो. आता चालू झाली आमची टेनिस
बॉल स्पर्धा या दगडावरून त्या दगडावर त्या दगडावरून दुसऱ्या दगडावर नुसत्या उड्या मारत
होतो. बिंबनाळेतील दगड मजबूत असल्याने शिवाय घसारा कमी असल्याने उतराई आरामात होत
होती
 |
| बिंब नाळेत प्रवेश |
 |
| बिंब नाळ |
२०मिनिटात किंचित अवघड असलेल्या पहिल्या टप्प्यावर आलो. आमच्याकडे रोप होता पण
त्याचा उपयोग न करता तो टप्पा आरामात सर्वानी उतरला.सूर्यदेव आरामात वर येत असल्याने
नाळेत मस्त गारवा होता इथेच पहिला ब्रेक घेऊन मस्त ब्रेड जाम आणि संत्री वर ताव मारला
थोडी विश्रांती घेत पुढे निघालो.
 |
| बिंबनाळ पहिला कातळटप्पा |
 |
| बिंबनाळ पहिला कातळटप्पा |
 |
| थोडी पेटपूजा |
तेव्हा ८:३० वाजले होते सर्व काही वेळेत होत असल्याने
आरामात चाल करत होतो. बिंबनाळेत बऱयाच ठिकाणी धबधब्याची वाट असल्यामुळे सलग दुसरा कातळटप्पा
लागला अजून किती कातळटप्पे लागतील याचा अंदाज नव्हता.पण सर्व गडी घाटवाटांन मध्ये मुरलेले
असल्याने दुसरा टप्पा हि रोपचा उपयोग न करता पार करण्यात आला.
 |
| दुसरा कातळटप्पा |
आता सूर्यदेव आपली काम चोख
बजावत होता आणि आमच्या पायांची गती वाढू लागली. छोटेमोठे कातळटप्पे पार करत नाळेच्या
पायथ्याला आलो मागे वळून पाहिलं
 |
| तिसरा कातळटप्पा |
 |
| बिंबनाळ पायथ्यातून दिसणारा माथा |
 |
| आग्यानाळेकडून येणारा ओढा |
तर बिंब नाळेचा माथा उंचच उंच वाटतं होता. आता वाट
उजवीकडे वळली आग्यानाळेकडून आलेल्या ओढ्याला
मिळाली तेव्हा वेळ झाली होती १०:३०. इथे ओढ्याजवळ मस्त खादाडकी करून अर्धा तास आराम
केला. आता भर उन्हात फणशीच्या नाळेची चढाई करायची होती त्यामुळे पाण्याच्या बाटल्या
भरून घेतल्या दापोली कडे जाणाऱ्या ओढयातून १५ ते २० मिनिटात तिठ्यावर आलो.
 |
| ओढयातून चाल |
 |
| उजवीकडे तवीची नाळ |
 |
| डावीकडे फणशीची नाळ आणि तिचा माथा |
जिथे तीन
वाटा लागतात सरळ ओढ्यातून दापोली दुसरी उजवीकडे तवीची नाळ जी पुढे सिगापूर नाळेला भेटते
तर तिसरी डावीकडची फणशीची नाळ. फणशीच्या नाळेत झाडोरा होता पण माथा उंचच उंच वाटत होता
चांगलीच वाट लागणार हे मनात ठेवून एक एक पाऊल सांभाळून टाकत होतो. चुकून पायाजवळचा
एखादा दगड निघाला तर त्या नाळेत माझ्या पायाची नाळ फुटायची त्यामुळे आरामात चाल करत
२०मिनिटात दम लागला.
 |
| फणशीची नाळेची चढाई |
इतक्यात देवाने बॉम्ब टाकला फणशीची नाळ चढल्यानंतर जेवण करु मग
काय बैलासारखी मुंडी खाली घालून पुढे चालू लागलो. मनोमन वाटले दुपारी २ लाच माथा गाठू
पण ते शक्य नव्हतं कारण हि तसंच कोकणात असल्याने शिवाय उन्हाने नाळ तापल्याने प्रचंड
गरम होत होत शिवाय त्यामुळे दम हि लागत होत एव्हाना ३/४ ब्रेक्स झाले. देवा आणि नितीन
मोरे दादांनी आणलेल्या संत्री आणि द्राक्षांवर ताव मारला.
 |
| संत्री आणि द्राक्ष्यावर ताव |
 |
| परत एकदा ग्रुप फोटो |
आता तवीची नाळ समोर दिसत
होती त्यामागे लिंगाणा बोराट्याची नाळ, सिंगापूर नाळ असा बराचसा प्रदेश उलगडू लागला.
नाळेत आता उन्हाचा त्रास कमी होऊ लागला आणि आमच्या पायगाडीला वेग येऊ लागला तब्बल २
ते २:३० तासाच्या चढाईनंतर दुपारी २:३० वाजता नाळेच्या माथ्याजवळ आलो.
 |
| तवीची नाळ,लिंगाणा पाठी बोऱ्याट्याची नाळ,सिंगापूर नाळ |
 |
| फणशीच्या नाळेचा माथा |
पुढे घनदाट
जंगलापायी वाट अशी नव्हतीच त्यामुळे प्रसना वाघ याच्या ब्लॉगचे वाचननुसार डावीकडच्या
उभ्या सोंडेवर आलो इथून कारवीच्या जंगलात घुसखोरी करून फणशीच्या नाळेच्या उजवीकडच्या
खांद्यावर आलो.
अमोल कारवीच्या जंगलात वाट काढत पुढे चालत होता त्याच्या मागे मी,विश्राम,
देवा आणि नितीन दादा एका ठिकाणी खूपच गचपण होत त्यामुळे अमोल थांबला मग देवा ने लीड
घेतली आणि जो कि नाही त्या कारवीच्या जंगलात घुसला त्यामुळे आमच्यासारख्या बारीक माणसाला
ती वाट म्हणजे राजमार्ग म्हणावं लागेल ते ५ मिनिटांचं कारवीचे जंगल पार करताच डावीकडून उजवीकडे
जाणारी फडताड नाळेची वाट लागली आता सर्व चांगले हाशहुश करून मोकळा श्वास टाकू लागलो.
डावीकडे जननीच्या ठाण्याकडे वळलो १० ते १५ मिनिटाच्या चालीवर जननीच्या ठाण्याजवळ मस्त
बैठक मारली बसलो.
 |
| जननीचे ठाणे |
 |
| जेवायला या जबरदस्त मेनू हाय |
तेव्हा असे वाटले पाय आहेत कि नाही ते पण मला शिव्या देत असतील कुठं
कुठं फिरवतो हा माणूस. आता भूक अनावर होत होती अमोल ने मस्त चटणी चपाती तर
देवा ने बुर्जी अहाहाहा मस्त जेवणावर ताव मारला. जेवणानंतर १०/१५ मिनिटाची
विश्रांती घेतली मस्त फ्रेश झालो आणि एकलगाव ची वाट धरली.
 |
| एकलगावकडे वाटचाल |
 |
| सह्याद्रीचा पॅनोरामा |
देवाच्या मते अजून दोन तासाची चाल आहे शिवाय गाड्या सिंगापूर गावात असल्याने ती अतिरिक्त चाल होणार ती वेगळी मजल
दरमजल एक एक सोंड पार करत एकलगावात पोचलो तेव्हा ५ वाजले होते.
आता पाय हातात घेऊन
चालायची वेळ आली होती कसेतरी एकलगावच्या फाट्यावर आलो. अमोल विश्राम आणि नितीन दादा
ने बॅगा आमच्या दोघंकडे देऊन सिंगापूर गावाकडे धाव घेतली. आम्ही ते परत येईपर्यंत
एक झोप काढली पण संध्याकाळची बोचरी थंडी आणि वारा झोपू देत नव्हता मग इकडे बघ तिकडे
बघ नजर तोरणा किल्ल्यावर जडली.
 |
| रायगड आणि लिंगाणा सूर्यास्त |
मित्रानो आजपर्यंत बरेच किल्ले केले पण राजगड आणि तोरणा
किल्ल्यावर अजूनही गेलो नाही जाऊ कि पहिल्या घाटवाटा मग किल्ले तेही मस्त २/३ दिवसाची सुट्टी काढून आरामात.
६:१५ च्या सुमारास विश्राम गाडी घेऊन आला त्याच्या मागे अमोल त्या दोघांचा निरोप घेऊन
गाडी वेल्हेच्या दिशेने पळवली. कारण पेट्रोल संपायला आले होते ६:४५ दरम्यान वेल्हे
मध्ये पेट्रोल भरून मस्त जेवणावर ताव मारला आणि गाडी मुंबई दिशेने पळवली. परत तेच जबरदस्त
थंडी पण यावेळी आम्हां दोघांना त्याची जणू सवय झाली आम्ही दोघे केलेल्या ट्रेकच्या
गप्पा मारत कधी खंडाळा घाट उतरून चौक गावाजवळ आलो माहित पडलं नाही. मस्त चहा ढोसून रात्री ११:३०
मुंबई मध्ये विश्राम दादाच्या घरी पोचलो खरं पण दोघेही एवढे थकलेलो असतानाही वाटत होतो
आता परत ट्रेक जातोय कि काय