भिरा घाट- अंधारबन
- सावळघाट - देवकुंड...
सहयाद्री मध्ये आजपर्यंत खूप
फिरलो पण घाटवाटा
करण्याची इच्छा मनात सारखी
सलत होती. त्याच
वेळी दिपकने अचानक
बॉम्ब टाकला घाटवाटा
करायला येतोस का लागलीच
हो बोलून टाकलं
शुक्रवारी ऑफिस ची
काम संपून मी
आणि दीपक कोपरखेरनेला
विश्रामच्या घरी पोहचलो...
दीपक जेऊन आला
नव्हता त्यामुळे आम्ही जेवायला
जवळच्या हॉटेल मध्ये गेलो
आणि आमच्या गप्पा
रंगल्या. रात्री १२ वाजता
आम्ही जेवण करून
घरी आलो आणि
आता झोपूया ठरवून
पडलो पण दिपकची
बडबड काही कमी
होत नव्हती (या
गप्पांमध्ये केदार जाधव पासून
ते बुडबुडे पर्यंत
सर्व विषय आले
:P). ३.३० ला
झोपून सकाळी ५
वाजता उटायचा ठरला
होत पण ५
चे ६ झाले...
पटापट आवरून घराबाहेर
पडलो बाहेर येऊन
टपरीवर चहा घेतली
आणि पनवेल चा
रस्ता धरला आधीच
उशीर झाला होता
त्यामुळे गाड्या सुसाट चालू
होती.. ती पण
ट्रिपल सीट पनवेल
वरून खोपोलीला आणि
थंडी ने आपण
आहोत याची जाणीव
करायला सुरवात केली होती.
खोपोली पाली रस्त्याला
लागलो तसा गाडीचा
वेग कमी होत
गेला... थंडी, मध्येच रस्त्यावर
धुकं आणि त्यात
थोडी भर म्हणून
खड्डे दर मजल
करत आम्ही पाली
ला पोहचलो, लांबूनच
बल्लाळेश्वरच दर्शन घेऊन नेहमीच्या
हॉटेल ला पेटपूजा
केली.. जास्त टाइमपास न
करता आम्ही पाली
रवाळजे भिरा रस्ता
धरला... भिरा गावात
पोहचलो तेव्हा ९ वाजले
होते.. गाड्या तिथेच ठेऊन
आम्ही भिरा डॅम
चा रास्ता धरला
पुढे गेल्या वर
समजला कि डॅम
वरून जायला परवानगी
नाही.. तिथे उभा
राहून थोडी ओळख
काढली आणि ते
काका जरा जास्तच
ओळखीचे निघाले आणि त्यांनी
आम्हाला जायला परवानगी दिली...
| शोध भिरा धरणाजवळील घाटवाटांचा |
| भिरा धरणाकडे वाटचाल |
| भिरा धरण |
| भिरातून हिर्डी गावाकडील वाट |
गप्पा चालू असताना मामा कडून समजल कि या वाटेवर एका ठिकाणी पिण्याचे पाणीचा छोटासा झरा आहे आणि ते पाणी मे महिन्यात पण असत.. तसा आमचा बैल (विश्राम ने ठेवलेला नाव :p) मामा सांगून पाण्याच्या वाटेवर घेऊन निघाला आणि त्याच्या मागे आम्ही दोघे.. अर्धी वाट चढून वर आलो वाटेत एक मोठा कातळ लागतो तिथून थोडे पुढे गेलो कि वाट थोडी वाकडी करून डाव्या हाताला जाते (आम्ही गेलो होतो तेव्हा वाट नव्हती मामा असल्यामुळे आम्ही तिथे पोहचलो).. आम्ही पाण्याच्या झऱ्या जवळ पोहचलो पण पावसामुळे जिथे माती साचून तो झरा पूर्ण भरला होता पण झरा चालू होता... मामाने त्यांच्या मधली माती कडून साफ केला त्यामुळे पाणी आता त्या खळग्यामध्ये राहायला सुरवात झाली होती.. या पुढे कोणी येईल त्यांना पाणी मिळेल असा मामा बोलत निघाले आणि त्यांच्या मागे आम्ही १०मिन मध्ये आम्ही परत वाटेवर आलो. या वाटेवरचा हा एकच पाण्याचा श्रोत जो बारा महिने असतो.
| पाण्याच्या झऱ्याकडील वाट |
| डावीकडे नागशेतला उतरणारी गाढवलोट घाटवाट |
| सरळ जाणारी वाट हिर्डी गावाकडे |
| हिर्डी गावातील पांडवकालीन मंदिर |
मंदिराच्या बाहेर एक मोडी लिपीत शिलालेख आहे पण तो नीट वाचता येत नाही... मंदिर मध्ये महादेवाची मूर्ती, पिंडी आणि बाहेर नंदी आहे.. मंदिरात शिरावं त्याचा डाव्या हाताला पाण्याचं टाक आहे त्या मधल पाणी पिण्यायोग्य आहे... मंदिराचे फोटो घेऊन तिथेच पोट पाणी केला.. एव्हाना १२ वाजले होते सूर्याजी राव डोक्यावर येऊन थांबले होते..बॅगा भरून आम्ही लगेच निघालो पुढे अंधारबन घाट पार करून आम्हाला पिंपरी तलावा जवळ निघायचे होते...
| अंधारबन घाट |
अंधारबन हा तसा सर्व पावसामध्ये करतात पण आम्हाला थोडी मस्ती म्हणून आम्ही हा उलटा प्ल्यान केला होता... अंधारबन घाट हा कसा आहे ते आता पर्यंत सर्वांनाच माहित असेल त्यामुळे त्या बद्दल जास्त लिहायचे टाळतो..अंधारबन मधून खाली भिरा आणि कुंडलिका दरी पाहण्यासारखी आहे..
फोटोस आणि व्हिडिओस घेऊन तब्बल २ तासात आम्ही पिंपरी तलावाजवळ पोहचलो... हिरडी अंधारबन ते पिंपरी तलाव हा प्रवास खूपच शांत आणि रम्य होता. भयाण शांतता होती. कुंडलिका पॉईंट वरून कुंडलिका दरी आणि आजूबाजूचा परिसर बघुन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो..
| कुंडलिका दरी |
| पराटेवाडीतून सावळघाट वाटेला लागताना |
परातेवाडी ला उतरून परत भेटू बोलून आम्ही गावात शिरलो...गावात वाट कशी आहे विचारणा केली. कोकणात उतरण्यासाठी गावकऱ्यांना ताम्हिणीघाटाच्या गाडी रस्त्याची सोय असल्याने, सावळघाटाची पाऊलवाट अजिबात वापरात नाही. परातेवाडीतून बाहेर पडत पठारावरून पश्चिमेला सह्यधारेकडे उतरत निघालो. घड्याळात २:३० झाले होते.. माळावरच्या करवंदीच्या जाळीमधून बाहेर पडत एका धारेवर आलो आणि आम्ही नक्की कुठे आलो आहोत याचं दृश्य उलगडू लागलं. तिथे घाट उतरायची वाट शोधायला लागलो आणि मग सोबत आणलेल्या माहिती वाचू लागलो तेव्हा समजला कि आपण चुकीच्या धारेवर आलो आहोत... मग तिथून परत परातेवाडीच्या मागे येऊन दुसरी धार पकडून वाटेवर आलो.. दगडावर दगड ठेवलेली दिसली आणि आणि आपण आता बरोबर आहोत यांची खात्री झाली... एव्हाना या मध्ये तास निघून गेला होता...
| सावळघाट वाट |
| देवकुंड आणि आजूबाजूचा परिसर |
| भिरा धरण |
![]() |
| Add caption |
![]() |
| बुजलेल्या पाण्याच्या टांक्या |
![]() |
| कोरलेल्या पायऱ्या |
![]() |
| पाण्याच्या टांक |
![]() |
| कोरलेल्या पायऱ्या |
दिप्या झाडीच्या गचपणात घुसत आणि वाट पुढे आहे सुनिश्चित करत असे वाटेवर प्रचंड घसारा होता. थोडी सुरुवातीला अरुंद बेचक्यातून दगडातून उभी उतरंड उतरणारी पुसट वाट खाली गेली होती. मध्ये मध्ये पिवळ्या ऑईलपेंटने रंगवलेले दिशादर्शक बाण दिसत होते.
![]() |
| दिशादर्शक बाण |
![]() |
| दुतोंडी टाकं |
![]() |
| अंधारबन घाटाचं दर्शन |
![]() |
| टाक्यापासून पुढील वाटचाल |












No comments:
Post a Comment